बातम्या
जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश! सर्व बँकांनी मार्चअखेर पीक कर्ज वाटपाचे १००% उद्दिष्ट पूर्ण करावे!
By nisha patil - 3/21/2025 4:47:43 PM
Share This News:
जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश! सर्व बँकांनी मार्चअखेर पीक कर्ज वाटपाचे १००% उद्दिष्ट पूर्ण करावे!
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बँकांनी मार्च अखेर पीक कर्ज वाटपाचे १००% उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. जिल्हा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
या आढावा बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीवकुमार सिंह, प्रबंधक आर्थिक समावेश आणि विकास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विशाल गोंडके, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी.एम. शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे आदी उपस्थित होते .
या बैठकीत प्रामुख्याने 100% पीक कर्ज वाटप: मार्च अखेर सर्व बँकांनी हे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक.आहे तसेच गुंतवणूक व उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सहकार्य करणेसाठी बँकांनी उद्योजकांना आवश्यक कर्ज पुरवठा करावा.आणि शासकीय योजनांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचा आदेश.या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी कोलॅटरल फ्री पीक कर्जाची मर्यादा 1.60 लाख रुपयांवरून 2.00 लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. तसेच केंद्र शासनाची व्याज परतावा योजनेअंतर्गत पीक कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी दिली . 2024-25 पतपुरवठा आराखड्यात डिसेंबर अखेर 86% उद्दिष्ट पूर्तता झाली आहे.
बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक राजीवकुमार सिंह म्हणाले:"आम्ही मार्च 2025 पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करू याचा आम्हाला विश्वास आहे!"
जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश! सर्व बँकांनी मार्चअखेर पीक कर्ज वाटपाचे १००% उद्दिष्ट पूर्ण करावे!
|