बातम्या

गोकुळ शिरगावमध्ये  सुतार  कुटुंबाकडून शिवजयंती उत्साहात साजरी...

In Gokul Shirgaon Shiv Jayanti was celebrated with enthusiasm by Sutar family


By nisha patil - 2/20/2025 12:16:29 PM
Share This News:



गोकुळ शिरगावमध्ये  सुतार  कुटुंबाकडून शिवजयंती उत्साहात साजरी...

शिवरायांच्या महान पराक्रमाला केले वंदन...

गोकुळ शिरगाव येथील प्रसिद्ध व्यावसायिक वसंत कुमार सुतार  यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात शिवजयंती साजरी केली. या सोहळ्यात कुटुंबातील सर्व सदस्यांनी सहभाग घेत शिवरायांच्या महान पराक्रमाला वंदन केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने कुटुंबातील लहानग्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी पोशाख व आभूषणे परिधान करून शिवरायांच्या जीवनकार्याची आठवण जागवली. त्याचप्रमाणे घरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने महाराजांची आरती आणि पूजा करून श्रद्धेने अभिवादन केले. घरातील मंगलमय वातावरणाने हा सोहळा अधिक भक्तिपूर्ण झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपूर्ण कुटुंबाने शिवजयंती साजरी केली. महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित विचार आणि प्रेरणादायी संदेश देत या प्रसंगी उपस्थितांनी इतिहासाच्या गौरवशाली क्षणांना उजाळा दिला.

वसंत कुमार सुतार यांनी या शिवजयंती उत्सवात परिवाराच्या एकात्मतेचे आणि परंपरांच्या जतनाचे अनोखे उदाहरण घालून दिले.


गोकुळ शिरगावमध्ये  सुतार  कुटुंबाकडून शिवजयंती उत्साहात साजरी...
Total Views: 29