बातम्या
शिवाजी विद्यापीठात उमेश बोळकेंच्या काजवाने स्पार्कची सांगता...
By nisha patil - 1/3/2025 8:47:17 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात उमेश बोळकेंच्या काजवाने स्पार्कची सांगता...
बी. ए फिल्म मेकिंग अभ्यासक्रमांतर्गत स्पार्क फिल्म फेस्टिवलचे आयोजन
शिवाजी विद्यापीठात बी.ए फिल्म मेकिंग अभ्यासक्रमांतर्गत दोन दिवसीय स्पार्क चित्रपट महोत्सवाचा समारोप दिग्दर्शक उमेश बोळके यांच्या काजवा लघु चित्रपटाने झाला. बी.ए फिल्म मेकिंग अभ्यास क्रमाअंतर्गत दिनांक 27 व 28 फेब्रुवारीला स्पार्क फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. फेस्टिवल मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त लघुपट आणि माहितीपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले.
या दोन दिवस सुरू असलेल्या फेस्टिवल मध्ये पहिल्या दिवशी सचिन सुर्यवंशी यांच्या वारसा आणि सॉकर सिटी , मेध प्रणव पवार यांचा हॅपी बर्थडे, नितेश परुळेकर यांचा बॅकयार्ड या लघु चित्रपट आणि माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
या महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी उमेश बगाडे यांची अनाहुत , स्वप्नील पाटील यांचा मधुबाला आणि उमेश बोळके यांचा काजवा लघु चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी दिग्दर्शकांनी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांनी आपल्या चित्रपट कृतीविषयी संवाद साधला व त्याचे शंका समाधान केले.
शिवाजी विद्यापीठात उमेश बोळकेंच्या काजवाने स्पार्कची सांगता...
|