बातम्या
लिंबू चौक, इचलकरंजी येथे व्यायामशाळा कंपाऊंड बांधकाम शुभारंभ सोहळा
By nisha patil - 1/17/2025 2:06:29 PM
Share This News:
लिंबू चौक, इचलकरंजी येथे व्यायामशाळा कंपाऊंड बांधकाम शुभारंभ सोहळा
माजी मंत्री आणि आमदार मा. प्रकाशआण्णा आवाडे यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या विकासासाठी, आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या फंडातून मंजूर कंपाऊंड बांधकाम या प्रकल्पाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
"विकासकामे ही केवळ सुविधा नव्हे, तर समाजाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाची पायरी आहेत. लिंबू चौक परिसरातील व्यायामशाळेच्या विकासामुळे नागरिकांना उत्तम आरोग्य व फिटनेससाठी आधुनिक सुविधा मिळतील. हा प्रकल्प परिसरातील लोकांसाठी मोठी संपत्ती ठरेल."
यावेळी माजी नगरसेवक नागेश पाटील, माजी नगरसेवक संतोष शेळके, माजी नगरसेवक मोहन कुंभार, चालक-मालक संघटना अध्यक्ष सचिन जाधव, मनोज खोत, बाबू डिग्रजकर, निखिल जमाले, राजू पुजारी, तातासो कुंभोजे, अमर नवाले सर, आप्पासो शिंदे, ज्योती पाटील, सुप्रिया शिंदे, संगीता घोरपडे, शेलार मॅडम यांच्यासह भागातील जेष्ठ नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लिंबू चौक, इचलकरंजी येथे व्यायामशाळा कंपाऊंड बांधकाम शुभारंभ सोहळा
|