विशेष बातम्या
कोल्हापूर विमानतळावर साडेसात कोटींच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे लोकार्पण
By nisha patil - 3/25/2025 7:48:54 PM
Share This News:
कोल्हापूर विमानतळावर साडेसात कोटींच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे लोकार्पण
कोल्हापूर, ता. २३: कोल्हापूर विमानतळावर प्रवासी आणि सुरक्षेसाठी दुबईहून आणलेल्या साडेसात कोटी रुपये किमतीच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हे ६ हजार लिटर पाणी, ८०० लिटर फोम आणि २०० किलो ड्राय केमिकल पावडर साठवू शकणारे वाहन ७० मीटर अंतरावर पाण्याचा मारा करून आग विझवण्यास सक्षम आहे.
🔹 वाहनाची वैशिष्ट्ये:
-
२५ सेकंदात ८० किमी प्रतितास वेग गाठण्याची क्षमता
-
आगीच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता
-
१०-१२ वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश
या लोकार्पण सोहळ्यात विमानतळ अधिकारी अनिल शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते. खासदार महाडिक यांनी वाहनात बसून अग्निशमनाची प्रात्यक्षिके पाहिली आणि यामुळे विमानतळाच्या सुरक्षेला अधिक बळ मिळेल, असे सांगितले.
कोल्हापूर विमानतळावर साडेसात कोटींच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे लोकार्पण
|