बातम्या
विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 5/3/2025 3:33:25 PM
Share This News:
विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी, ६ मार्च २०२५ रोजी, सायंकाळी ४:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती विन्स हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विन्स हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात हे एक पुढचे पाऊल उचलले असून, पश्चिम महाराष्ष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. पत्रकार परिषदेस न्यूरोसर्जन डॉ. आकाश प्रभू, डॉ. डीओना प्रभू,डॉ. संदीप पाटील, व्यंकट होळसंबे, संदीप वनमाळी, चिन्मय ठक्कर, दामोदर घोलकर ,आदी उपस्थित होते.
विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
|