बातम्या

टोप येथील श्री. एम.टी. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन

Inauguration of the new building


By nisha patil - 3/18/2025 5:36:00 PM
Share This News:



टोप येथील श्री. एम.टी. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन

टोप (ता. हातकणंगले) येथील श्री. एम.टी. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्याने बांधलेल्या वास्तूचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी माजी खासदार निवेदिता माने (वहिनी), जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. प्रदीप नानासो पाटील, शिवराज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक एम.टी. पाटील (भाऊ), संस्थेच्या चेअरमन प्रविणा प्रदीप पाटील, व्हा. चेअरमन इंद्रजित दिलीप लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच शिवराज एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष दौलत महादेव पाटील, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पुरंदर पाटील, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत गुरव, लक्ष्मण अवघडे, अंबपवाडीचे सरपंच पांडुरंग नामदेव खोत, कासारवाडीचे सरपंच अच्युत खोत यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, टोप, कासारवाडी, अंबपवाडी गावचे पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टोप येथील श्री. एम.टी. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन
Total Views: 25