बातम्या
जांभळे, गैबान गटाचा अजित पवार गटात प्रवेश
By Administrator - 3/27/2025 5:20:52 PM
Share This News:
इचलकरंजी :शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ताकद वाढत असून, शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. इचलकरंजीतील प्रभावी जांभळे गट, गैबान गट आणि चोपडे गटाने मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच, अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनीही यावेळी प्रवेश करून आपला पाठिंबा दर्शवला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर गौरव कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी इचलकरंजीला भेट दिली आणि पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या गटांत मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.
इचलकरंजीत जांभळे, गैबान गटाचा अजित पवार गटात प्रवेश
|