बातम्या
पँथर आर्मीचे मुंबई आझाद मैदानात बेमुदत उपोषण
By nisha patil - 3/3/2025 8:49:02 PM
Share This News:
पँथर आर्मीचे मुंबई आझाद मैदानात बेमुदत उपोषण
मुंबई – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
ही योजना भूमीहिन शेतमजुरांसाठी असून, शेतजमिनीच्या खरेदीसाठी असलेली कमाल मर्यादा हटवावी, तसेच बाजारभावानुसार जमीन खरेदी करून द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संतोष आठवले, डॉ. राजेंद्रसिंग वालिया, उमेश जामसंडेकर, अमोल कुरणे आदी नेते करत असून, मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, कर्जमाफी, रमाई आवास योजनेत सुधारणा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता असून, प्रशासनाची भूमिका काय राहील याकडे लक्ष लागले आहे.
पँथर आर्मीचे मुंबई आझाद मैदानात बेमुदत उपोषण
|