बातम्या

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये सैन्य अग्निवीर भरती 10 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत

Indian Armed Forces Recruitment of Army Agniveer

By nisha patil - 3/29/2025 5:13:20 PM
Share This News:

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये सैन्य अग्निवीर भरती 10 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत

कोल्हापूर, दि. 28  : भारतीय सैन्यदलामध्ये सैन्य अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये अग्निवीर (जनरल ड्युटी (GD)), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपीक / स्टोअर किपर (टेक्निकल), अग्निवीर ट्रेडमन्स (10 वी उत्तीर्ण), अग्निवीर ट्रेडमन्स (8 वी उत्तीर्ण) पदांसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर ऑनलॉईन अर्ज भरावेत.

ही भरती सेना भरती कार्यालय, कोल्हापूर यांच्या अंतर्गत जिल्हा कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यातील नव युवकांसाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवकांनी दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावेत, असे आवाहन, अधीक्षक तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत फाटक (निवृत्त) यांनी केले आहे. 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये सैन्य अग्निवीर भरती 10 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत
Total Views: 59