बातम्या
लोकशाही दिनी प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या सूचना
By nisha patil - 3/3/2025 8:50:14 PM
Share This News:
लोकशाही दिनी प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या सूचना
कोल्हापूर, दि. 3: जिल्ह्यातील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढून नव्याने दाखल अर्जांवर तत्पर उत्तर द्या, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या.
महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित लोकशाही दिनाच्या बैठकीत त्यांनी हा निर्देश दिला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अति. उपायुक्त राहुल रोकडे, उपजिल्हाधिकारी मुद्रांक विवेक वाघमोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या लोकशाही दिनादिवशी एकूण 166 नवीन अर्ज दाखल झाले. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयात 75, जिल्हा परिषदेत 36, तर इतर विभागांत 55 अर्ज सादर झाले.
शासनाच्या 100 दिवसांच्या गतिमान प्रशासन उपक्रमाअंतर्गत अर्जांचा तातडीने निपटारा होण्यासाठी प्रत्येक विभागाने सोमवारी व शुक्रवारी वेळ देऊन अर्ज निकाली काढावेत, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
लोकशाही दिनी प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या सूचना
|