बातम्या
कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध उपक्रमाने संपन्न
By nisha patil - 10/3/2025 2:05:10 PM
Share This News:
कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध उपक्रमाने संपन्न
विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.
कोरगावकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आलाय. यावेळी आयोजित कार्यक्रमात आहार तज्ञ आणि योग तज्ञ जयश्री घोलप प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या . प्रमुख वक्त्या म्हणून शाहू कॉलेजच्या प्राध्यापिका नम्रता यादव यांना आंमत्रित केले होते . प्रारंभी जयश्री घोलप आणि प्राध्यापिका नम्रता यादव यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तसेच प्रभाकरपंत कोरगांवकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या जयश्री घोलप आणि प्राध्यापिका नम्रता यादव यांचा सत्कार पर्यवेक्षिका प्रमिला साजणे आणि मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते करण्यात आला. योगतज्ञ आणि आहार तज्ञ जयश्री घोलप यांनी योगाचे आणि आहाराचे महत्व विषद करतानाच प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. नम्रता यादव यांनी आजची महिला आणि महिला दिन याविषयी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या विद्यार्थ्यानी सुसंगत आणि परिणामकारक गीताचे सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली . यावेळी निवेदिता पवार, शीतल गणेशाचार्य, कोमल क्षीरसागर, वनिता माने, निशा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते
कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध उपक्रमाने संपन्न
|