बातम्या
संविधानाचा जागर गावागावांमध्ये होणे आवश्यक – प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई
By nisha patil - 1/23/2025 2:11:13 PM
Share This News:
संविधानाचा जागर गावागावांमध्ये होणे आवश्यक – प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई
संविधान महावाचनाचा आजचा चौथा दिवस..
तारा न्यूज साठी कोल्हापूर प्रतिनिधी: विक्रम केंजळेकर . ज्या पद्धतीने विविध धर्मग्रंथांचे पारायण गावागावांमध्ये होते त्याच पद्धतीने संविधानाचे देखील पारायण गावागावांमध्ये व्हावे : असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई (डाएट.) यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल शिक्षण समूह मार्फत आयोजित केलेल्या संविधान महावाचन सप्ताहाध्ये बोलत होते.
ज्या पद्धतीने विविध धर्मग्रंथांचे पारायण गावागावांमध्ये होते त्याच पद्धतीने संविधानाचे देखील पारायण गावागावांमध्ये व्हावे : असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई (डाएट.) यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल शिक्षण समूह मार्फत आयोजित केलेल्या संविधान महावाचन सप्ताहाध्ये बोलत होते. आदर्श गुरुकुल शिक्षण समूहमार्फत संविधान महावाचन सप्ताह सुरू आहे पुढे भोई म्हणाले की" संविधानामुळे मानवी जीवनाची मुले रुजले जातात भारतीय संविधान हे भारताचे नसून संपूर्ण विश्वाचे मार्गदर्शक ग्रंथ आहे. यावेळी एबीपी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए.बी पाटील म्हणाले की आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्र समाज व व्यक्तिगत प्रगतीसाठी संविधानाचा जागर गरजेच आहे. गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेला हा उपक्रम समाज उपयोगी असून त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये ११११ विद्यार्थ्यांच्या सहभागाने संविधान महावाचन सप्ताह आजचा चौथा दिवस आहे.यावेळी या उपक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाशदादा पाटील , आळते हायस्कूलचे मुख्याध्यापक बाहुबली शिखरे, टोप हायस्कूलचे मुख्याध्यापक के.बी.पाटील,भादोले हायस्कूलचे मुख्याध्यापक रघुनाथ नांगरे यांनी या उपक्रमास भेटी देऊन शुभेच्छा दिल्या..
संविधानाचा जागर गावागावांमध्ये होणे आवश्यक – प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई
|