बातम्या
जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे आशा सेविकांचा सत्कार
By nisha patil - 10/3/2025 2:09:29 PM
Share This News:
जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे आशा सेविकांचा सत्कार
कोल्हापूर – जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेतील ७० आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
महानगरपालिकेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास ग्रुपच्या अध्यक्ष सौ. सुप्रिया सुनील शिंदे, उपाध्यक्ष योगिता सांगावे, तसेच सौ. सुवर्णा पाटील, सौ. पूनम शहा, सौ. रसिका गरुड, सौ. तन्वी पाटील, सौ. छाया रेणुसे या सदस्य उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी आरोग्य अधिकारी श्री. प्रकाश पावरा सर यांनी विशेष सहकार्य केले. आशा सेविका कोरोनाकाळासह विविध काळात आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची कदर करण्यासाठी आयोजित या सत्कार सोहळ्यामुळे सेविकांनी आनंद व्यक्त केला.
जागर स्त्री शक्ती सामाजिक कार्य ग्रुपतर्फे आशा सेविकांचा सत्कार
|