बातम्या
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा 10 एप्रिलला साखरपुडा
By nisha patil - 3/14/2025 3:51:02 PM
Share This News:
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा 10 एप्रिलला साखरपुडा
अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या लग्नाची तयारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा 10 एप्रिलला होणार आहे. जय पवार यांची पत्नी ऋतुजा पाटील (प्रवीण पाटील यांची मुलगी) ही सोशल मीडिया कंपनीच्या व्यवस्थापनात कार्यरत आहे.
साखरपुडा होण्यापूर्वी, जय आणि ऋतुजा यांनी शरद पवार यांच्याकडून आशीर्वाद घेतला. यावेळी शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. पवार कुटुंबासाठी हा सोहळा खास असून, राजकीय वर्तुळात यावर चर्चा होत आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा 10 एप्रिलला साखरपुडा
|