बातम्या
टाकळीवाडीत कावीळचा कहर...
By nisha patil - 3/15/2025 3:15:52 PM
Share This News:
टाकळीवाडीत कावीळचा कहर...
तरुणाचा मृत्यू, अनेक आजारी
टाकळीवाडीत सध्या कावीळ आजाराने गंभीर रूप धारण केले असून, लहान बालकांपासून तरुणांपर्यंत अनेक नागरिक या आजाराने त्रस्त आहेत. नुकताच कावीळमुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक विद्यार्थी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
गावात यापूर्वीही कावीळच्या साथीनं थैमान घातलं होतं, मात्र या वेळी रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. अद्याप कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून हाती घेण्यात आल्या नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
टाकळीवाडीत कावीळचा कहर...
|