बातम्या
के. पी. पाटील स्वगृही परतीच्या तयारीत
By nisha patil - 4/3/2025 5:19:32 PM
Share This News:
के. पी. पाटील स्वगृही परतीच्या तयारीत
राधानगरीतील राजकीय हालचालींना वेग..
राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या पाटील यांनी शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा घड्याळ हाती घेतले असून, त्यांच्या पाठोपाठ सुपुत्र रणजित पाटीलही सक्रिय झाले आहेत.दरम्यान, माजी आमदार उल्हास पाटील व संजय घाटगे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून, उद्धवसेनेला याचा मोठा फटका बसणार आहे. राधानगरीतील राजकारण पुन्हा रंगतदार वळणावर येण्याची चिन्हे आहेत.
के. पी. पाटील स्वगृही परतीच्या तयारीत
|