बातम्या

"काकवी" - गुळापेक्षाही अधिक पौष्टीक !!

Kakvi more nutritious than jaggery


By nisha patil - 10/15/2024 5:54:30 AM
Share This News:



आपल्या सर्वांना गूळ खाण्याचे अनेक फायदे माहिती आहेत. साखरेला पर्याय म्हणून गुळ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण, गुळापेक्षाही अधिक पौष्टीक अशी काकवी बऱ्याच लोकांना ऐकूनही माहिती नसेल.

उसाच्या रसापासून गूळ बनवण्याची प्रक्रिया तीन टप्प्यातून जाते. पहिले म्हणजे ऊसाचा रस दुसरे म्हणजे काकवी आणि शेवटी गूळ तयार होतो. सोप्या शब्दात सांगायचे तर ऊसाचा रस गरम केल्यावर गुळ बनण्यापूर्वी एक द्रव तयार होतो. ज्याला काकवी म्हणतात. म्हणजेच गूळ बनण्यापूर्वी खाण्यायोग्य उसाच्या रसापासून बनवलेले द्रव म्हणजे काकवी होय.

काकवी केवळ गुऱ्हाळ घरातच मिळते. ती वर्षभर पॅक करून साठवता येते. त्यामूळे अनेक लोक तिचे नियमीत सेवन करू शकतात. पण, अनेक लोकांना काकवीचे फायदे माहिती नसल्याने बहुगुणी काकवी लोक वापरत नाहीत. त्यामुळेच आज त्याचे फायदे जाणून घेऊयात.

साखरेला बेस्ट पर्याय : 

गोड खाणे कोणाला आवडत नाही. पण, काही लोकांसाठी साखर ही विष असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गोडवा मिळवण्यासाठी काकवी हा एक बेस्ट पर्याय आहे. आयुर्वेदात काकवीचे फायदे आणि गुणधर्माशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

शरीर मजबूत बणवते : 

काकवी पचायला हलकी असते. जी शरीराला सहज पचवता येते. त्यामुळे शरीर मजबूत होते. जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांच्यासाठी काकवी फायदेशीर आहे. काकवी हाडे मजबूत करण्यातही मदत करते.

रक्त शुद्ध करते : 

रक्ताशी संबंधित दोषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास खूप मदत करते. याशिवाय रक्त शुद्ध करण्यास देखील मदत करते. शरीराचा थकवा दूर करून ऍनर्जी वाढवते.

काविळीवर उपचार : 

अनेकदा कावीळ आणि अशक्तपणा बरा करण्यासाठी ग्रामीण भागात काकवी खाण्याचा सल्ला दिला जातो.


"काकवी" - गुळापेक्षाही अधिक पौष्टीक !!