बातम्या

करवीर तालुका शिवसेनेचा तीव्र निषेध..

Karveer Taluka Shiv Sena strongly protests


By nisha patil - 8/3/2025 5:10:36 PM
Share This News:



करवीर तालुका शिवसेनेचा तीव्र निषेध..

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या प्रतिमांना जोडे मारले

औरंगजेबाचे उदात्तीकरण व शिवरायांचा अपमान; करवीर शिवसेनेचा संताप.. 

करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उंचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्रद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या प्रतिमांना जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा आबू आझमी आणि मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भैय्याजी जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली.

यावेळी तालुकाप्रमुख राजू यादव यांनी सांगितले की, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव शिवसेना हाणून पाडेल. तसेच प्रशांत कोरटकरवर कठोर कारवाई व आबू आझमीची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.


करवीर तालुका शिवसेनेचा तीव्र निषेध..
Total Views: 34