बातम्या

"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयी

Khandoba Training Club and Shri Shivaji Tarun Mandal won


By nisha patil - 3/4/2025 8:15:54 PM
Share This News:



"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयी

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत  खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला.

सामन्याची सुरुवात माजी उपमहापौर विक्रम जरग, शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल इंगवले, विशाल बोंगाळे, शिवतेज खराडे, अजय खापणे, दुर्गेश लिंग्रस, काकासाहेब जाधव, संजय कुराडे, किशोर साठे, संदीप साठे, लालासाहेब गायकवाड, संजय पडवळे, अनिल सावंत, शेखर पवार, संपत मंडलिक, महेश निकम, बाळासाहेब भोसले, रोहित मोरे, अभिजीत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.

आजच्या दिवसातील पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने संध्यामठचा ३-२ असा पराभव केला. पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून खंडोबा संघाच्या संकेत मेढेची निवड झाली. 

आजच्या दिवसातील दुसरा सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात संघाचा श्री शिवाजी तरुण मंडळांने फुलेवाडी फुटबॉल क्लबचा ४-०ने पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून श्री शिवाजी तरुण मंडळाच्या बसंता सिंगची निवड झाली.


"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयी
Total Views: 28