बातम्या

घ्या जाणून...नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक

Know


By nisha patil - 12/8/2024 7:35:00 AM
Share This News:



नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळामधील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्येही केला जातो. नारळ पाणी स्वाथ्यासाठी पौष्टीक असते. कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात.

जेवणाला पर्याय म्हणूनही तुम्ही खोबरे खाऊ शकतात. नारळात फायबर्स मोठ्याप्रमाणात आढळतात. अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणार्‍यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो.

अनियमित मासिक पाळीचा त्रास असणार्‍या महिलांनी रोज 10 ग्रॅम ओल्या नारळाचा गर खावा. तसेच गायीचे दूधही प्यावे. मासिक पाळी संबंधी सर्व समस्या सुटतील. शीघ्रपतनाचा त्रास असणार्‍या पुरूषांनी रोज सुखे खोबरे आणि गायीच्या दूध प्यायल्याने विशेष लाभ होतो

नारळ पाणी पोटाचे विकार दूर करण्‍याचे काम करते. अल्सरसारखा आजार बरा होतो. किडनी, थायरॉइड, डायबिटीज व मुत्राशयाचा विकार असलेल्या लोकांनी नारळ पाणी मोठ्याप्रमाणात सेवन करावे. नारळात अनेक व्हिटामीन असतात ते पचनास फार लाभदायी असतात. पोट दूखत असल्यास किंवा गॅस झाल्यास नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्याने उलटीही थांबते. 

नारळ खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे. नारळाच्या दूधात एक चमचा खसखस आणि एक चमचा मध मिसळून रोज रात्री पिल्याने फायदा होतो.

तोंडात फोड असल्यास ओले नारळाच गर खावा आणि जास्तीत जास्त नारळ पाणी प्या.

नारळाचे तेल रोज त्वचेवर लावल्यास त्वचा सतेज होते.

आंबट दही, मुलतानी माती आणि खोबरेल तेल एकत्र करून लावल्यास केस चमकदार होतात. 
दररोज दोन-तीन नारळाचे पाणी सेवन केल्यास चेहरा उजळतो.

हिवाळ्यात रोज रात्री सुखे खोबरे खावे. रात्री झोपताना चेहरा, मान आणि त्वचेवर खोबरेल तेल लावून हाताने हळूवार मसाज करावी. सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतील. नारळाचा गर चेहर्‍यावर लावल्याने, चेह-यावरील व्रण नाहिसे होतात.

गर्भवती महिलांनी रोज नारळाचा गर खाल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत राहते. तसेज सुदृढ बाळ जन्माला येते. खोबरेल तेलात बदाम बारिक करून टाकावे. डोके दुखीवर हे तेल रामबाण औषणीचे काम करते. 
पोटात जंत झाल्यास रोज सकाळी किसलेले खोबरे खावे.


घ्या जाणून...नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक