बातम्या

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

Know the medicinal properties of lemon


By nisha patil - 8/16/2024 7:24:36 AM
Share This News:



आपण कोणत्याही पदार्थात लिंबू आवडीने खातो. तसेच उन्हाळ्यात लिंबू सरबत हे आपल्या आवडीचं असत. परंतु लिंबाचे अजूनही फायदे आहेत. त्याचे महत्व जर आपण जाणून घेतले. तर आपल्याला अनेक आजारावर नियंत्रण ठेवता येते. कारण लिंबाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या अनेक आजारावर नियंत्रण ठेऊ शकते.

 लिंबाचे औषधी गुणधर्म खालील प्रमाणे :

१) लिंबू हे अजीर्णावर अतिशय फायदेशीर आहे. लिंबू आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून निखाऱ्यावर गरम करावे. आणि ते वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी हा त्रास कमी होईल.

२) तुम्हाला जर उलट्या होत असतील. तर त्यावर खडीसाखर टाकून लिंबू चोखले तर उलट्या कमी होतील.

३) तुम्हाला जर वारंवार पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही आल आणि लिंबाच्या रसात साखर घालून ते पिलात तर तुमची पोटदुखी थांबेल.

४) पित्त होत असेल तर रोज लिंबाचे सरबत घ्या त्याने भूक वाढते. खाल्लेलं अन्न पचत आणि शौचास साफ होते. त्यामुळे तुम्हाला पित्तापासून आराम मिळतो.

५) अचानक उचकी येत असेल तर वाळलेले लिंबू मधात घालून चाटले तर उचकी थांबते.

६) अंगाला जर खाज येत असेल तर लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा गरम पाण्याने अंघोळ करावी. खाज कमी होईल.


जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म