बातम्या

नैराश्य दूर ठेवण्यासाठी घरच्याघरी करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या

Know these home remedies to ward off depression


By nisha patil - 5/4/2024 7:24:06 AM
Share This News:



चुकीची जीवनशैली, स्पर्धा, धावपळ, कामाचा बोजा, ध्येय गाळण्याची घाई, आदीमुळे जीवनात नैराश्य येणे ही सध्या सामान्य मानली जात आहे. अनेक व्यक्त या समस्येने त्रस्त असल्याचे दिसून येते. नैराश्याची ही समस्या का उद्भवते याची कारणे जाणून घेतली तर यावर घरच्याघरी उपचार करणे अधिक लाभदायक ठरू शकते. यासाठी वेळीच सावध होणे खुप आवश्यक आहे. नैराश्य घालवण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधांची माहिती आपण घेणार आहोत. यामुळे ताणतणातून मुक्तता मिळू शकते.

भृंगराज
तणाव दूर करण्यासाठी भृंगराज चहा घ्या. यामुळे मस्तिष्काला निरंतर उर्जा मिळते. मस्तिष्कामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते. डोके शांत राहते. पूर्ण शरीराला आराम मिळतो.

जटामासी
जटामासी ही तणावमुक्त करणारी वनौषधी म्हणून ओळखली जाते. याच्या मुळांचा वापर औषध म्हणून केला जातो. ही मुळे मस्तिष्क आणि शरीराला विषारी घटकांपासून म्हणजेच टॉक्सिन्सहून मुक्त करतात. मेंदूच्या कार्याला मदत करतात.


ब्राह्मी
ब्राह्मी ही वनस्पती तणाव उत्पन्न करत असलेल्या हार्मोन कोर्टिसोलला कमी करते. ब्राह्मी मस्तिष्काला शांत ठेवते. एकाग्रता वाढवते.

अश्वगंधा
अश्वगंधामुळे काम करण्याची क्षमता वाढते. यामुळे थकवा जाणवत नाही. यात एमीनो अ‍ॅसिड्स आणि व्हिटॅमिन असते.


नैराश्य दूर ठेवण्यासाठी घरच्याघरी करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या