बातम्या

पावसाळ्यात आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय खावे काय खाऊ नये, जाणून घ्या

Know what to eat and what not to eat to stay safe from diseases during monsoons


By nisha patil - 1/7/2024 6:20:00 AM
Share This News:



कडक उष्णतेपासून पाऊस हा अराम देतो, पाऊस पडल्यानंतर सरावाचा हायसे वाटते, कारण गर्मीमुळे सारेच त्रस्त झालेले असतात. पण पाऊस जेव्हा येतो तेव्हा आपल्यासोबत डेंगू, मलेरिया, डायरिया, उल्टी, पोटदुखी आणि संक्रमण देखील घेऊन येतो. कारण वातावरणामध्ये संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. पावसाळ्यात रोगप्रतिकात्मक शक्ती कमी होते. ज्यामुळे अनेक आजार शरीरावर लागलीच कब्जा करतात. म्हणून पावसाळ्यात रोगप्रतिकातमक शक्ती वाढण्यासाठी काय खावे ते जाणून घ्या आणि आजारी पडू नये याकरिता काय खाऊ नये हे जाणून घ्या.पावसाळ्यात काय खावे- ताजे फळे आणि भाज्या 
पावसाळ्यात ताजे फळे आहे भाज्या खायला हव्यात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या पावसाळी वातावरणात दुधी, दोडके, भेंडी, परवल आणि कारले या भाज्या खाव्यात. सीजन नुसार फळे जसे की, आंबा, सफरचंद, नासपती, जांभूळ, डाळींब आणि चेरी हे आरोग्यवर्धक आहे. 
गरम पेय पदार्थ-
पावसाळ्यामध्ये हाइड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच यासोबतच आल्याचा चहा, तुळशीचा चहा आणि सूप इत्यादी गरम पेय सेवन करावे. कारण हे रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवायला मदत करतात. हलके आणि ताजे जेवण करावे-
या वातावरणामध्ये घरचे हलके, ताजे, गरम जेवण करावे. वाफवलेल्या भाज्या खाव्या. डाळ, खिचडी आणि सूप सारखे हलके जेवण करावे. हे पदार्थ सहज पचतात आणि ऊर्जा प्रदान करतात.
 
दही आणि ताक 
पावसाळ्यात प्रोबायोटिक्स सारखे दही, ताक आणि फर्मेंटेड फूड्स खाणे आरोग्यसाठी लाभदायक असतात. हे घटक रोगप्रतिकातमक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
 
पावसाळयात काय खाऊ नये- तळलेले पदार्थ टाळावे 
या वातावरणात समोसा, पकोडे आणि चिप्स सारखे तेलकट पदार्थ टाळावे. हे पाचनतंत्र बिघडवतात.
 
कच्चे सलाड-
कच्चे सलाड खाणे टाळावे कारण पावसाळ्यामध्ये यांत बॅक्टीरिया जमा होतो. 
 
सी-फूड टाळावे- 
पावसाळ्यात मासे खाणे टाळावे, कारण पावसाळ्यात माशांचे सेवन आरोग्याला घटक ठरू शकते.


पावसाळ्यात आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय खावे काय खाऊ नये, जाणून घ्या