बातम्या
पनवेलमध्ये "कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५" सोहळा; कोल्हापूरकरांच्या कार्याचा सन्मान
By nisha patil - 10/3/2025 2:03:56 PM
Share This News:
पनवेलमध्ये "कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५" सोहळा; कोल्हापूरकरांच्या कार्याचा सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये भव्य सोहळा; आमदार विनय कोरे यांची उपस्थिती
पनवेल (मुंबई) येथे कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवाशी संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त "कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोल्हापूरकरांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी विशेष भेट देत पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील, पी.डी. पाटील (सर), डी.वाय.एस.पी. विजय लगारे, मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, कानसा-वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक दादा पाटील, अरविंद माने, सर्जेराव शेठ माईंगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पनवेलमध्ये "कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५" सोहळा; कोल्हापूरकरांच्या कार्याचा सन्मान
|