विशेष बातम्या
कोल्हापूर युवासेनेचा शिक्षण सहसंचालक कार्यालयावर आक्रमक पवित्रा
By nisha patil - 4/4/2025 11:00:30 PM
Share This News:
कोल्हापूर युवासेनेचा शिक्षण सहसंचालक कार्यालयावर आक्रमक पवित्रा
"भ्रष्टाचार थांबवा, पूर्णवेळ अधिकारी द्या – अन्यथा ऑफिसला टाळे ठोकू"
कोल्हापूर शिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अपुऱ्या वेळेसाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि शिवाजी विद्यापीठ हद्दीतील संस्थांचे अनेक कामे प्रलंबित असूनही, सहसंचालक आठवड्यात फक्त दोनच दिवस हजर राहतात. त्यामुळे युवासेनेने त्वरित पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, जर आठ दिवसांत पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात आला नाही आणि भ्रष्टाचार सुरूच राहिला, तर अधिकार्यांना काळे फासून कार्यालयाला टाळे ठोकले जाईल. यावेळी जिल्हा प्रमुख मंजित माने, चैतन्य देशपांडे, अमित बाबर, सुमित मेलवंकी, अक्षय घाटगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर युवासेनेचा शिक्षण सहसंचालक कार्यालयावर आक्रमक पवित्रा
|