बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यास सहा ‘बाल स्नेही’ पुरस्कारांचा सन्मान
By nisha patil - 4/3/2025 5:05:28 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यास सहा ‘बाल स्नेही’ पुरस्कारांचा सन्मान
मुंबई (3 मार्च) – महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याला एकूण सहा ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे पार पडला. प्रमुख उपस्थितींमध्ये आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सूसीबेन शहा, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व पंकज भोयर यांचा समावेश होता.
बाल हक्क संरक्षण, सुरक्षा आणि विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांना हे पुरस्कार दिले जातात. बालरक्षा अभियान आणि बाल स्नेही पुरस्कार उपक्रमांद्वारे आयोग बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा सन्मान जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त प्रयत्नांचा असल्याचे प्रतिपादन केले.
कोल्हापूर जिल्ह्यास सहा ‘बाल स्नेही’ पुरस्कारांचा सन्मान
|