बातम्या

कोरटकर चा होणार उद्या फैसला...

Koratkars verdict will be announced tomorrow


By nisha patil - 3/17/2025 4:55:18 PM
Share This News:



कोरटकर चा होणार उद्या फैसला...

प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोर्टाचा निकाल उद्या

कोल्हापूर सत्र न्यायालयात आज प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कोर्टाने निकाल राखून ठेवला असून उद्या (दि. १८ मार्च) अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्रशांत कोरटकर प्रकरणी जामीन मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडली. सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला विरोध केला, तर कोरटकर यांच्या वतीने बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. कोर्टाने संपूर्ण सुनावणी ऐकून घेत निकाल राखून ठेवला असून उद्या यावर अंतिम निर्णय होणार आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून नागरिक आणि संबंधित पक्ष या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.


कोरटकर चा होणार उद्या फैसला...
Total Views: 20