बातम्या
कृष्णा डोणे महाराजांनी आदमापुरात केली भाकणूक..
By nisha patil - 3/27/2025 4:30:30 PM
Share This News:
कृष्णा डोणे महाराजांनी आदमापुरात केली भाकणूक..
श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळुमामा च्या वार्षिक भंडारा मोठ्या उत्साहात पार पडला पहाटे संत बाळूमामा मंदिरासमोर भाकणूकदार कृष्णा डोणे महाराजांनी भाकणूक केली. या भाकणुकीत त्यांनी देशासह राज्याच्या राजकारणावर भाकणूक केली.
तर या भाकणुकीमध्ये भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्र बनेल, हिंदू धर्माची संस्कृती बाहेरील देशात आत्मसात करतील देशात समान नागरी कायदा येणार, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, आदमापूर हे दुसरी काशी म्हणून ओळखले जाईल, बाळू धनगराचा वाडा बघण्यासाठी जगातून माणसे येतील, तसंच नदी जोड प्रकल्प येईल , दुष्काळी भागात नंदनवन होईल , राजाच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण होईल, कोल्हापूरचा राजकारण ढवळून निघेल, देशात नवीन कायदा येईल, मोठी महामारी होईल, उष्णतेच्या लाटा येतील, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील त्यांचा जयजयकार होईल व हिंदू धर्माची पताका जगात मिरवेल, महागाईचा भस्मासुर येईल, उन्हाळ्याचा पावसाळा होईल आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकरायला येईल, आदमापूर वर माझा आशीर्वाद राहील अशी भाकणूक करण्यात आली.
कृष्णा डोणे महाराजांनी आदमापुरात केली भाकणूक..
|