बातम्या

वृक्षासन योग करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या

Learn the correct method of doing Vrikshasana yoga and its benefits


By nisha patil - 5/17/2024 6:22:18 AM
Share This News:



योगाभ्यास करणे तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फायदेशीर आहे. मात्र, योगाभ्यास करताना चुकीची आसन, मुद्रा किंवा चुकीचा श्वास घेण्याचा मार्गही आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. तुम्ही योगा करणे सुरु केले असेल तर काही बेसिक योगा करा ज्यात जास्त वळण नसतात हे करायला सोपे असतात.योगाभ्यास सुरु करत असला तर या योगासनांचा सराव करा. सर्वात सोपे योगासन हे वृक्षासन आहे. ज्याला इंग्रीजमध्ये ट्री पोझ म्हणतात. वृक्षासनामध्ये शरीर झाडा प्रमाणे असते आणि त्यात संतुलन राखावे लागते. वृक्षासन करण्याची योग्य पद्धत खबरदारी आणि फायदे जाणून घ्या.
 
वृक्षासन कसे करावे- 
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा.उजवा गुडघा वाकवा, आणि उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा. डावा पाय सरळ ठेऊन शरीराचे संतुलन करा. हात डोक्याच्या वर करा आणि नमस्तेच्या मुद्रात तळवे एकत्र करा. काही वेळ अशाच स्थितीत राहा नंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या.खबरदारी
जरी वृक्षासनाचा सराव सर्व प्रकारे सुरक्षित आहे आणि प्रत्येकजण करू शकतो. परंतु उच्च रक्तदाबाच्या बाबतीत वैद्यकीय सल्ल्यानंतर किंवा तज्ज्ञांसमोरच सराव करा.
उच्च रक्तदाब असलेल्यांनी वृक्षासन करताना नमस्ते आसनात यावे, हात छातीजवळ ठेवावेत, हात डोक्याच्या वर उचलू नयेत.
जर तुम्हाला चक्कर किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर या आसनाचा सराव करणे टाळा.
 
वृक्षासनाचे फायदे
वृक्षासन हे एक संतुलित आसन आहे, जे शारीरिक आणि भावनिक संतुलन सुधारण्यास मदत करते.
वृक्षासनामुळे पाय, घोटे, वासरे, गुडघे आणि मांड्या यांचे स्नायू मजबूत होतात.
या आसनामुळे एकाग्रता सुधारते.
या योगाभ्यासामुळे सायटीकाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
वृक्षासनाने पाठीचा कणा मजबूत होतो.
गुडघे मजबूत करते आणि हिप सांधे सैल ठेवण्यास मदत करते
डोळे, कान आणि खांदे मजबूत करण्यासाठी हे सहज प्रभावी आहे.
या आसनामुळे छातीची रुंदी वाढण्यास मदत होते.


वृक्षासन योग करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या