बातम्या
दंतमंजनाने काय फायदे होतात ते पाहू.
By nisha patil - 10/15/2024 5:56:15 AM
Share This News:
◼️तोंडातील लाळग्रंथी द्वारे सतत लाळ पाझरत असते. लाळ ग्रंथींचे स्वास्थ्य संतुलित असेल तर त्यातून स्रवणारी लाळ ही योग्य प्रमाणात पाझरते. लाळ नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. दंतमंजनामुळे लाळग्रंथीचे स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि त्यातून निर्माण होणारा लाळ रसही योग्य स्वरूपात पाझरतो. लाळरस पचनास व रोगप्रतिकारशक्ती अबाधित राखण्यासाठी अतिशय आवश्यक घटक आहे.
◼️हिरड्यांना मसाज केल्यामुळे हिरड्या मजबूत होतात. हिरड्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हिरड्यांचे काही आजार असतील तर ते दंतमंजनामुळे बरे होण्यास मदत होते.
◼️दातांवरील सुरक्षाकवचही सुरक्षित राहून दातांची स्वच्छता राखली जाते.
दंतमंजनात कोणत्या औषधींचा समावेश होतो?
दंतमंजन किंचित तुरट, किंचित तिखट , किंचित कडू चवीचे असावे. त्यानुसार त्यामध्ये वनस्पतींचा समावेश करतात. जसे कडुनिंब, लवंग, त्रिफळा चूर्ण, भीमसेनी कापूर, सैंधव, तुरटी , हळद इ.
त्रिफळा चूर्णामध्ये किंचित सैंधव मिसळूनही वापरू शकतो.
◼️दातून अर्थात् वनस्पतींच्या काडीचा ब्रश तयार करून वापरावा. जसे बब्बूल, कडुनिंब, आंबा, वड , खदिर ( खैर ) इ.
◼️दंतमंजन गोड, खारट, आंबट चवीचे नसावे.
◼️बाजारात दंतमंजन सहज उपलब्ध आहेत जसे विको, सनातनचे दंतमंजन, माकडछाप इ. अनेक पर्याय आहेत.
◼️पूर्वी भारतात देशी गायी घरोघरी होत्या. गाईची शेणी ( गोवरी ) जाळून त्या राखेमध्येच थोडे सैंधव मिसळून दात घासले जात. आज अनेक गोशाळा गाईच्या शेणाच्या राखेपासून दंतमंजन तयार करत आहेत. तेही बाजारात उपलब्ध आहे.
◼️तसेच आपण ज्या भागात राहतो त्या भागातील तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे सैंधव व हळद मिसळून हिरड्यांना मसाज करू शकतो. त्यामुळे हिरड्या मजबूत होतात.
★ दंतमंजन कसे करावे?
दंतमंजनासाठी आपल्या बोटांचा वापर करावा . अंगठ्याच्या बाजूचे बोट ( तर्जनी ) सोडून इतर कोणतेही बोट वापरु शकतो. तर्जनीमुळे दात व हिरड्यांवर जास्त जोर पडतो. दाब जास्त पडल्याने ईजा होऊ शकते.
अशा रितीने लहानपणापासूनच मुलांना दंतमंजन पावडरचीच सवय लावणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच अगदी सोपेही आहे. दंतमंजन पावडर मूलांनी गिळली तरी कोणताही अपाय नाही. औषधी वनस्पतीच पोटात जातील. तोंडातील लाळग्रंथी, दात, हिरड्या ह्यांचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्यात दंतमंजनाइतका सुरक्षित दुसरा कोणताही पर्यायच नाही.
दंतमंजनाने काय फायदे होतात ते पाहू.
|