बातम्या

शेंडा पार्क येथे दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी 10 एकर जमीन द्यावी – आमदार अमल महाडिक यांची मागणी

MLA Amal Mahadik demands 10 acres of land for a dental college at Shenda Park

By nisha patil - 3/22/2025 8:09:35 PM
Share This News:

शेंडा पार्क येथे दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी 10 एकर जमीन द्यावी – आमदार अमल महाडिक यांची मागणी

कोल्हापूर येथे शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याला 2011 सालीच मंजुरी मिळाली असली तरी जागेअभावी ते अद्याप सुरू झालेले नाही.

आमदार अमल महाडिक यांनी यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय नगरीतील 10 एकर जागा महाविद्यालयासाठी देण्याची मागणी केली. मंत्री मुश्रीफ यांनी लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्याचा विश्वास दिला आहे.

शेंडा पार्क येथे दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी 10 एकर जमीन द्यावी – आमदार अमल महाडिक यांची मागणी
Total Views: 14