बातम्या
आ. अशोकराव माने यांची अनुसूचित जाती समिती सदस्यपदी निवड..
By nisha patil - 3/27/2025 4:43:40 PM
Share This News:
आ. अशोकराव माने यांची अनुसूचित जाती समिती सदस्यपदी निवड..
कार्यकर्त्यांमध्ये आनंद
महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यपदी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.
आ. माने यांनी अनुसूचित जातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे या समाजाच्या हिताचे अनेक निर्णय प्रभावीपणे राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मतदारसंघातील विविध कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.
आ. अशोकराव माने यांची अनुसूचित जाती समिती सदस्यपदी निवड..
|