बातम्या
मुंबई गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेची जोरदार तयारी!
By nisha patil - 3/21/2025 4:40:08 PM
Share This News:
मुंबई गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेची जोरदार तयारी!
ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
कोल्हापूर : येत्या 30 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) गुढीपाडवा मेळाव्यासाठी तयारीला वेग आला आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, यासाठी कोल्हापुरातील ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. गुढीपाडवा मेळावा हा मनसेसाठी महत्वाचा असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी आणि पक्षबांधणीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
बैठकीला मनसेच्या विविध विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबईत होणाऱ्या शक्तीप्रदर्शनासाठी शिस्तबद्ध आणि संघटित सहभाग महत्त्वाचा असल्याचे वरिष्ठांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक उपस्थित राहतील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेची जोरदार तयारी!
|