विशेष बातम्या

शिरोली दुमाला येथे महाकुंकूमार्चन सोहळा संपन्न...

Mahakunkumarchan ceremony concluded at Shiroli Dumala


By nisha patil - 4/4/2025 10:54:30 PM
Share This News:



शिरोली दुमाला येथे महाकुंकूमार्चन सोहळा संपन्न...

या सामुदायिक उपासनेत १००० पेक्षा जास्त महिला सहभागी

शिरोली दु. : गेली ५० वर्ष राजकीय, सामाजिक. शिक्षण, कृषी, दुग्ध अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्य विश्वास पाटील अमृत महोत्सवी गौरव समितीच्यावतीने आपल्या संस्कृतीत हळदीकुंकू करण्याची परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे स्त्रियांनी एकत्र येण्याच्या सामाजिक हेतूनेच खास महिलांसाठी आयोजित सौभाग्य व सौख्यदायी श्री कुंकूमार्चन सोहळा आज शिरोली दु. ता. करवीर येथे संपन्न झाला.

या सामुदायिक धार्मिक उपासनेत शिरोली.दु व परिसरातील १००० पेक्षा अधिक सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या. परिसरातील अनेक महिला पहाटे ५ वाजले पासून कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित होत्या. विधीतील सहभागी सर्व महिलांना श्री महालक्ष्मी यंत्र, पादुका, कुंकू व मोठी स्टीलची वाटी आदी पूजेचे साहित्य समितीमार्फत देण्यात आले. यावेळी वाटीमध्ये पादुका ठेवून त्यावर सलग १००० वेळा अंबाबाईचा नामजप करत कुंकूमार्चन केले. पुजारी देवदत्त जोशी व सौ. मेघ बांभोरीकर यांनी सौभाग्यप्राप्ती, सौभाग्यवृद्धी, सौभाग्यवर्धनासाठी कुंकूमार्चनाचे महत्व सांगितले. या सोहळयासाठी अमृतमहोत्सवी वाढदिवस समितीच्यावतीने आवाहनानुसार या धार्मिक विधीत मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या. यावेळी मान.विश्वास पाटील यांना उपस्थित महिला भगिनीच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, नंदकुमार पाटील, अनिल सोलापुरे, सरपंच सचिन पाटील, माधव पाटील, सुनिल पाटील, राहुल पाटील, सर्जेराव पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील, सौ.उर्मिला पाटील, प्राजक्ता पाटील, राजश्री पाटील, बंदिनी पाटील, पल्लवी पाटील, नंदिनी पाटील, माधुरी जाधव, निर्मला निगडे तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.   
 


शिरोली दुमाला येथे महाकुंकूमार्चन सोहळा संपन्न...
Total Views: 8