बातम्या
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अजित पवारांना निवेदन...
By nisha patil - 3/27/2025 4:42:47 PM
Share This News:
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अजित पवारांना निवेदन...
सीमा तपासणी नाके बंद करू नयेत
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने राज्याचे वित्त व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सीमा शुल्क तपासणी नाके (चेक पोस्ट) बंद करू नयेत, अशी मागणी करण्यात आली. अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे हे निवेदन देण्यात आले.
या वेळी मनसे वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव, तसेच राहुल कुंभार, नयन गायकवाड आणि तुषार चिक्कोडीकर उपस्थित होते. मनसेने स्पष्ट केले की, चेक पोस्ट बंद केल्यास वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. राज्य सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अजित पवारांना निवेदन...
|