बातम्या
महायुती शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांसोबत बैठक – नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजनांची मागणी
By nisha patil - 2/28/2025 5:20:58 PM
Share This News:
महायुती शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांसोबत बैठक – नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजनांची मागणी
कोल्हापूर : शहरातील विविध नागरी समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महायुतीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौ. के. मंजूलक्ष्मी यांना दिला. माजी महापौर आणि नगरसेवकांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात विस्तृत चर्चा केली.
बैठकीत एलबीटी रद्द करणे, स्ट्रीट लाईट व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था, रिक्त पदे भरती, शिक्षकांच्या आशास्वित श्रेणीसंबंधी प्रश्न, प्रोव्हिडंट फंडातील दिरंगाई आदी मुद्द्यांवर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
माजी नगरसेवक सत्यजीत (नाना) कदम यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीला माजी महापौर सुनील कदम, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, नंदू मोरे, सीमा कदम यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महायुती शिष्टमंडळाने दिला.
महायुती शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांसोबत बैठक – नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजनांची मागणी
|