बातम्या

घरीच बनवा आवळ्याचे तेल, केस होतील घनदाट, लांब

Make amla oil at home


By nisha patil - 1/7/2024 6:16:46 AM
Share This News:



आवळ्याच्या गुंणाबद्दल कोणाला माहीत नाही असे होणार नाही. छोटासा दिसणारा आवळा पण त्यामध्ये मोठ्या मोठ्या रोगांवर उपचार करण्याची पात्रता आहे. केसांच्या समस्येसाठी आवळा खूप उपयोगी आणि परिणामकारक आहे. तसेच आवळ्याच्या तेलाने केस घनदाट आणि लांब होतात. तर चला आज जाणून घेऊ या की आवळ्याचे तेल घरी कसे बनवावे.आवळ्याचे तेल-
घरीच आवळ्याचे तेल बनवण्यासाठी बाजारातून ताजे आणी रसदार आवळे आणा. कमीतकमी 8 ते 9 आवळे घ्या. तसेच एक कप नारळाचे तेल आणि एक कप मोहरीचे तेल घ्यावे. आता आवळे स्वच्छ धुवून त्यांचे बीज काढून घ्यावे. व तुकडे करावे. आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करावे. याची पेस्ट बनवा पण यामध्ये पाण्याच्या थेंब देखील टाकू नका. 
 
आता लोखंडच्या कढईमध्ये ही पेस्ट घाला. व मिडीयम गॅस वर ठेवा. तसेच 5 ते 7 मिनिटानंतर गॅस वरून कढई काढून घ्या. रात्रभर कढईमध्येच राहुरी द्या. असे केल्याने आवळामधील सर्व गुण त्या तेलामध्ये उतरतील. तसेच आठवड्यातून 2 ते 3 वेळेस या तेलाने मॉलिश करावी. व सकाळी शॅंपू लावून केस धुवावे. असे केल्यास केस गळती लवकर थांबून नवीन केस येण्यास मदत होईल. तसेच केस मजबूत आणि घनदाट, लांब होतील.


घरीच बनवा आवळ्याचे तेल, केस होतील घनदाट, लांब