बातम्या

जास्वंदीच्या फुलांपासून घराच्या घरी बनवा केसांचे टॉनिक, केसांच्या सर्व समस्या होतील दूर

Make hair tonic from Jaswandi flowers at home


By nisha patil - 7/17/2024 7:40:37 AM
Share This News:



 आपल्या घरासमोर किंवा बागेत जर जास्वंदीच्या फुलांचे झाड असेल तर त्याचा केवळ गणपती बाप्पााच्या पूजेसाठी उपयोग होत नाही तर आयुर्वेदानुसार जास्वंदीचे फुले आणि पाने देखील केसांच्या आरोग्यासाठी टॉनिक म्हणून काम करतात. या फुलांपासून आपण केसांसाठी उत्तम तेल घरच्या घरी बनविता येणार आहे. बागेतील जास्वंदच्या फुलांचे तेल तयार करता येते. घरात आपण जास्वंदीच्या तेलाचे वापर करुन तेल बनविण्याची रेसिपी एकदम सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ लाल रंगाची जास्वंदीची फुले असायला हवीत, किंवा तुम्ही फुल बाजारातून देखील जास्वंदीचे लाल फुले विकत आणू शकता.आयुर्वेदात अनेक वनस्पतींचा औषधी उपयोग सांगितलेला आहे. अडळुसा, जास्वंद, कडूनिंब, कडीपत्ता, आवळा, पिंपळ, बेलाची पाने आणि फळे अशा अनेक वनस्पतींपासून उत्तम औषधे घरीच तयार करता येतात. जास्वंदीच्या झाडे हे एक औषधी वनस्पती आहे. या जास्वंदीपासून तुम्ही चांगले केसांचे औषधी तेल तयार करु शकता. जास्वंदीचे पाने आणि फुले खूपच औषधी असतात, केसांच्या आरोग्यासाठी जास्वंदीची फुले आणि झाडांची पाने घरी आणावीत, ही फुले लाल रंगाची असावीत. जास्वंदीच्या फुलात अनेक एण्टी ऑक्सीडेंट्स गुणधर्म असतात. अमिनो एसिड्स आणि फ्लेवेनाईड्स देखील त्यात असतात.त्यामुळे केसांच्या मुळांचे पोषण आणि हानिकारक अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून त्याचे संरक्षण होते.या फुलांपासून तयार केलेले तेल वापरल्यास केसांच्या मुळांना मजबूती मिळते. हे तेल बनवून साठवून देखील ठेवता देखील येते, त्यामुळे हे तेल केसांना दररोज लावल्यास केसांची गळती पूर्णपणे थांबते.

जास्वंदीचे तेल कसे तयार करावे
जास्वंद तेल तयार करण्यासाठी 10-15 जास्वंदीचे फुले आणा. ही फुले लाल रंगाची असावीत सोबत जास्वंदीच्या झाडाची काही पाने देखील आणा, या पानांना आणि फुलांना चांगले स्वच्छ पाण्याने धुवून काढा, त्यातील पाने आणि फुलांतील पाणी सुकण्यासाठी ती चांगली पंख्याखाली ठेवा, नंतर एका कढईत खोबरेल तेल ओतून ही पाने आणि फुले टाकून चांगली शिजवा. जोपर्यंत तेलाचा रंग लाल होत नाही तोपर्यंत हे मिश्रण उकळा. तेल हलक्या लाल तांबूस रंगाचे झाले की ही कढई तशीच सहा ते सात तास बंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवा. नंतर तेल थंड झाल्यावर ते एका बाटलीत भरुन ठेवा. हे तेल नियमित झोपताना मसाज करुन केसांच्या मुळांना लावा. आठवड्यातून किमान दोन वेळा हे तेल केसांच्या मुळांना नीट लावा. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.


जास्वंदीच्या फुलांपासून घराच्या घरी बनवा केसांचे टॉनिक, केसांच्या सर्व समस्या होतील दूर
Total Views: 1