बातम्या

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पोटली कचोरी, जाणून घ्या रेसिपी

Make potli kachori for evening snack


By nisha patil - 6/20/2024 6:17:16 AM
Share This News:



जर तुम्ही एकच प्रकारचे स्नॅक्स खाऊन खाऊन कंटाळले असाल तर, संध्याकाळी चहा सोबत तुम्ही नक्कीच पोटली कचोरी ट्राय करू शकता त. तर चला जाणून घेऊ या पोटली कचोरी रेसिपी साहित्य 
मैदा 
भिजवलेली मुगडाळ 
तेल 
जिरे पूड 
गरम मसाला 
धणे पूड 
बडीशोप पूड 
हिंग 
आमसूल पावडर 
तिखट 
हिरवी मिरची आले 
मीठ 
 
कृती 
पोटली कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी मैद्यामध्ये तेल गरम करून घालावे. मग थोडे थोडे पाणी घालून मळावे. मग गोळा तयार झाल्यानंतर बाजूला ठेऊन द्या. भिजवलेल्या मुगाच्या डाळीला बारीक करून पेस्ट तयार करा. आता पॅन मध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये हिंग, जिरे पूड, धणे पूड, बडीशोप पावडर, हिरवी मिरची, आले पेस्ट घालावी. हे मिश्रण चांगल्या प्रकारे परतवावे. आता यामध्ये बारीक केली मुगाच्या डाळीची पेस्ट सोबत मीठ, तिखट, गरम मसाला, आमसूल पावडर घालावी. आता डाळ कोरडी होइसपर्यंत परतावी. आता हाताला तूप लावून छोटे छोटे गोळे तयार करवून त्यामध्ये हे मिश्रण भरावे व गोलाकार आकार द्यावा. मग दोन्ही बाजूंनी कचोरी मध्यम गॅस वर तेलात तळून घ्यावी. तर चला तयार आहे आपली गरम गरम पोटली कचोरी, तुम्ही हे सॉस, चटणी सोबत देखील सर्व्ह करू शकतात.


संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पोटली कचोरी, जाणून घ्या रेसिपी