बातम्या

"स्त्री-पुरुष सहचार्य गरजेचे" – राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे-श्रीकर

Male and female companions are necessary


By nisha patil - 7/3/2025 10:49:46 PM
Share This News:



"स्त्री-पुरुष सहचार्य गरजेचे" – राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे-श्रीकर

कोल्हापूर – स्त्रिया उद्योग आणि विविध क्षेत्रांत उत्तम प्रगती करत असल्या तरी केवळ समानतेपुरते मर्यादित न राहता, स्त्री-पुरुष सहचार्यही तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सौ. स्नेहलता नरवणे-श्रीकर यांनी केले.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या लिंग संवेदनशीलता आणि महिला विकास कक्षातर्फे आयोजित "स्त्री प्रीन्युअर्स कॉन्क्लेव्ह" मध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात महिला उद्योजकांना सन्मानित करून उद्योगजगतात त्यांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात कलापौरी डॉट कॉमच्या सह-संस्थापक अपर्णा चव्हाण, ‘सिरी’च्या सह-संस्थापक अंजोरी परांडेकर, आर्किटेक्ट जानकी वैद्य, स्मार्ट महिला संस्थापक मनाली स्मार्ट, आरजे अनया, प्राचार्य स्नेहल पाटील, सिद्धी इंगळे आदी उद्योजिका उपस्थित होत्या.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, आयक्यूएसी संचालिका डॉ. शिंपा, प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे, डॉ. उमारणी जे. यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली दिवटे, तर आभार समृद्धी पाटील यांनी मानले.

 


"स्त्री-पुरुष सहचार्य गरजेचे" – राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे-श्रीकर
Total Views: 22