बातम्या

ममता कुलकर्णी अजूनही किन्नर आखाड्यासोबतच – लक्ष्मी नारायण त्रिपाठी

Mamta Kulkarni is still with the transgender community


By nisha patil - 3/24/2025 8:16:42 PM
Share This News:



ममता कुलकर्णी अजूनही किन्नर आखाड्यासोबतच – लक्ष्मी नारायण त्रिपाठी

नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्याची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले.

लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सांगितले की, ममता कुलकर्णी अजूनही किन्नर आखाड्यासोबत आहेत. काही जणांनी उगाचच वाद निर्माण केला होता, मात्र त्या त्र्यंबकेश्वर येथे आमच्यासोबत कुंभमेळ्यात सहभागी होतील.

त्यांनी आणखी स्पष्ट केले की, किन्नर आखाडा यंदाच्या कुंभमेळ्यात नाशिकमध्ये सहभागी होणार नाही, तर त्र्यंबकेश्वरमध्येच राहणार आहे. तसेच, आमच्या आखाड्यासाठी सरकारने जागा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा, या वादावरही त्यांनी भूमिका स्पष्ट करत नाशिक जिल्ह्याचा कुंभमेळा 'नाशिक' नावानेच ओळखला जावा, असे मत व्यक्त केले.


ममता कुलकर्णी अजूनही किन्नर आखाड्यासोबतच – लक्ष्मी नारायण त्रिपाठी
Total Views: 22