बातम्या

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

Mango leaves are also beneficial for health


By nisha patil - 8/15/2024 7:33:48 AM
Share This News:



आंबा हा फळांचा राजा आहे. तसेच त्याचा रस अतिशय मधुर असल्यामुळे अनेकांना आवडतो. लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तीपर्यंत आंबा हा सर्वांच्या आवडीचं फळ आहे. तसेच आंब्याच्या पानांचा सणसमारंभात ही उपयोग केला जातो. एवढच नाही तर आंब्याची पाने ही आरोग्यसाठी ही खूप फायदेशीर आहेत.
१) आंब्याच्या पानांच्या टोकात सी, बी व ए व्हिटॅमिन असते. व त्यात अन्य पोषणमूल्येही आहेत. अँटी ऑक्सिडंट म्हणूनही ही पाने उपयुक्त असून ती पाण्यात उकळून अथवा चूर्ण स्वरूपात वापरता येतात.

२) आंब्याची कोवळी पाने टॅनिनने युक्त असतात. डायबेटिसची सुरवात असेल तर ही पाने वाळवून पावडर करावी व पाण्यात रात्रभर भिजवून ती गाळून सकाळी हे पाणी प्यावे. त्याने मधुमेहाची लक्षणे कमी होतात.

३) ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी करण्यासाठी तसेच व्हेरिकोज व्हेन्स मध्येही ही पाने उपयोगी आहेत.

४) हायपर अँग्झायटीमुळे आलेली अस्वस्थता या पानांनी दूर करता येते. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. पित्तखडे अथवा मूत्रखड्याचा त्रास होत असेल तर पानांचे बारीक चूर्ण पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे व हे पाणी सकाळी प्यायलाने पित्तखडे, मूत्रखडे मोडतात व शरीराबाहेर पडतात.

५) भाजल्याने झालेल्या जखमा आंब्याच्या पानांची जाळून राख करून ती जखमांवर लावल्याने लवकर भरून येतात. या राखेमुळे त्वचा गार राहते. उचक्या लागत असल्यास अथवा घशाचा त्रास होत असल्यास ही पाने जाळून त्याचा नाकाने धूर ओढावा.


आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’