बातम्या
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: नवे धक्कादायक खुलासे
By nisha patil - 3/29/2025 5:17:38 PM
Share This News:
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: नवे धक्कादायक खुलासे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवे तपशील समोर येत असून, या प्रकरणातील गुन्हेगारी टोळीच्या हालचाली अधिकच उघड होत आहेत.
६ डिसेंबर २०२४ रोजी, सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर जाऊन वॉचमनला शिवीगाळ करत कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानुसार, घुलेने कंपनी सुरू ठेवायची असेल तर ही रक्कम अण्णाला द्या, अशी धमकी दिली होती.
त्याच वेळी, सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप करत गावकऱ्यांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सुदर्शन घुलेने सरपंचांना जिवंत न सोडण्याची धमकी दिली.
संतोष देशमुख यांच्या अपहरणाच्या वेळी उमरी टोल नाक्यावर त्यांची गाडी अडवली गेली. गाडीच्या काचेला दगड मारून त्यांना बाहेर खेचण्यात आले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवण्यात आले, जी स्वतः सुदर्शन घुले चालवत होता.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: नवे धक्कादायक खुलासे
|