बातम्या
आरोग्यसेवा, सामाजिक कार्य आणि गायन क्षेत्रातील चमकता तारा- माया सायलस मनपाडळेकर
By nisha patil - 12/3/2025 6:27:52 PM
Share This News:
आरोग्यसेवा, सामाजिक कार्य आणि गायन क्षेत्रातील चमकता तारा- माया सायलस मनपाडळेकर
माय सायलस मनपाडळेकर या पेशाने स्टाफ नर्स असून, गेल्या 27 वर्षांपासून आरोग्य विभागात अतुलनीय सेवा बजावत आहेत. सध्या त्या महानगरपालिकेच्या प्राध्यापक एम. आर. देसाई फिजिओथेरपी सेंटर, न्यू शाहूपुरी, बेकर गल्ली, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णांना मदत करण्याची त्यांची सेवा भावनेने युक्त आहे.
केवळ आरोग्यसेवा पुरवणेच नव्हे, तर सामाजिक कार्यातही माय सायलस मनपाडळेकर यांनी आपले मोठे योगदान दिले आहे. त्या यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (YMCA) या जगातील नंबर 1 सामाजिक संस्थेच्या सदस्य आहेत, जी गरजू आणि होतकरू मुलांना विविध खेळांमध्ये (टेबल टेनिस, बॅडमिंटन) संधी उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन देते. आपल्या सामाजिक बांधिलकीमुळे त्या समाजात आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.
गायन क्षेत्रातील अद्वितीय कामगिरी – वर्ल्ड रेकॉर्ड आणि SIFA Book Of Records मानकरी
माय सायलस मनपाडळेकर यांना लहानपणापासूनच गायनाची विशेष आवड होती. आपल्या या आवडीला त्यांनी कधीही मागे पडू दिले नाही. त्या सध्या सरगम म्युझिकल ग्रुप (SA) च्या सदस्य असून, विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत.
मे 2024 मध्ये प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित नऊशे गाण्यांचा मैफिली कार्यक्रमात भाग घेत, त्यांनी आपल्या गायन कौशल्याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. त्यांच्या सुरेल आवाजाने आणि जबरदस्त प्रस्तुतीने त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली
आरोग्यसेवा, सामाजिक कार्य आणि गायन क्षेत्रातील चमकता तारा- माया सायलस मनपाडळेकर
|