बातम्या

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

Measures to control high blood pressure


By nisha patil - 5/6/2024 6:05:48 AM
Share This News:



हल्लीची बदलती जीवनशैली माणसाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे.त्या पैकी १ समस्या म्हणजे उच्च रक्तदाब.या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्या वर गंभीर परिणाम होतो.म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा. 

पथ्यपाणी सांभाळा रक्त दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.आहारामध्ये फळं, पालेभाज्या,लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स,मीठाचा समावेश कमी करा.

मांसाहार कमी करा मासे बोनलेस चिकन,रेड मीट टाळा. तसेच आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

फिजिकली अ‍ॅक्टिव्ह रहा  नियमित चालणे हा व्यायाम केलात तरी अनेक आजारांपा- सून दूर राहू शकता.थोडक्यात फिजिकली अ‍ॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. 

वजन घटवणे  वाढणारे वजन उच्च रक्तदाबाच्या रूग्णां साठी त्रासदायक बाब आहे.त्या मुळे वेळीच आहार,व्यायामात बदल करून अतिरिक्त चरबी घटवा.

हे घटक कमी करा अशांनी आहारातील खारावलेले पदार्थ, अळणी पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणे टाळा.तसेच आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश वाढवावा.

मद्यसेवनावर नियंत्रण उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्या नंतर/आधी मद्यपान करत असलात तर त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे हे करणे टाळा. 

ताण-तणाव कमी करा मानसिक धक्का बसेल/ तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा. आवडत्या छंदामध्ये,योगाभ्यासामध्ये मन रमवा.


उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय