बातम्या

बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....

Medicinal and medicinal benefits of Acacia pods


By nisha patil - 9/7/2024 7:26:16 AM
Share This News:



आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे...

  (१)गुडघेदुखी कमी होते...
बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच गुडघेदुखी समूळ नष्ट होते.

(२)डोकेदुखी दूर होते..* वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..

(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...
आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर, पांढरे पाणी जाणे, अशा समस्या बहुतेक महिलांना होतात. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच.

(४) पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते...
बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो. वंध्यत्व दूर होते.

(५) पाठदुखी कंबरदुखी... या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात.

(6) जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...
बरेच वेळा, बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते, यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो.

*(७) अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर तुम्ही बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या. 

.तेव्हा वरील फायदे बघता बाभळीच्या शेंगांचे चूर्ण अतिशय मौल्यवान औषध आहे आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं. जरुर हि पावडर घरात असू द्यावी.


बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....