बातम्या

महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी २४ मार्चला मंत्रालयात बैठक...

Meeting to be held at Mantralaya


By nisha patil - 3/22/2025 1:06:28 PM
Share This News:



महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी २४ मार्चला मंत्रालयात बैठक...

हद्दवाढीसाठी निर्णायक पाऊल – क्षीरसागर यांचा पाठपुरावा यशस्वी होणार का?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीबाबत सोमवार, २४ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे ही बैठक निश्चित झाली आहे. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका १९७२ पासून हद्दवाढ न झाल्यामुळे विकासाच्या मर्यादा येत आहेत. या संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत पाठपुरावा केला होता. अखेर, २४ मार्च रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, संभाव्य विस्तारावर चर्चा होणार आहे.


महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी २४ मार्चला मंत्रालयात बैठक...
Total Views: 12