बातम्या
दुध उत्पादकांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाची आंघोळ
By nisha patil - 5/3/2025 4:09:35 PM
Share This News:
दुध उत्पादकांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाची आंघोळ
कोल्हापूर, दि. ५ (प्रतिनिधी) – गायीच्या दुधाचे थकीत असलेले सात रुपयांचे अनुदान मिळावे तसेच गायीच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर दर मिळावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना आणि जिल्हा दूध उत्पादक संघटना गुरुवारी, ६ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाची आंघोळ करणार आहेत.
यासाठी त्यांनी वेळोवेळी शासन दरबारी निवेदने, रस्त्यावर आंदोलन, आणि गाई घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता, तरीही शासनाने अद्याप मागणीचा विचार केला नाही. यावरून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी हजेरी लावावी, असे आवाहन एडवोकेट माणिक शिंदे, ज्योतीराम घोडके आणि सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.
दुध उत्पादकांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाची आंघोळ
|