बातम्या
सकाळी की सायंकाळी? कोणत्या वेळेत चालल्याने वजन होते कमी आणि..
By nisha patil - 4/29/2024 10:27:54 AM
Share This News:
दीर्घ आयुष्य जगण्याचा मंत्र म्हणजे चालणे (Evening Walk). चालल्याने अनेक आरोग्याच्या निगडीत समस्या सोडवण्यात मदत होते (Health Benefits). नियमित चालल्याने सांधे मजबूत, स्नायू लवचिक, मानसिक आरोग्य यासह वजन कमी करण्यास मदत होऊ शकते (Weight Loss). बरेच लोक सकाळी चालतात. काहींना वेळ मिळत नसल्यामुळे संध्याकाळी चालतात. तर काही जण जेवल्यानंतर शतपावली करतात.
पण काहींचा असा समज आहे की, सायंकाळपेक्षा सकाळी चालण्याचे फायदे अधिक आहेत. परंतु, इव्हनिंग वॉकचे देखील अनेक फायदे आहेत. जर आपल्याला कामाच्या व्यापामधून स्वतःसाठी वेळ मिळत नसेल तर, सायंकाळी चालायला जा. याचे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत. सायंकाळी चालण्याचे फायदे किती? पाहूयात
सायंकाळी चालण्याचे आरोग्यदायी फायदे...
पचनक्रिया सुधारते...
द हाऊस ऑफ वेलनेसच्या मते, जर आपल्याला पचनाच्या निगडीत समस्येचा सामना करावा लागत असेल तर, सायंकाळी चालायला जा. सायंकाळी किंवा रात्री चालल्याने पचनक्रिया सुधारते. जर आपण जेवणानंतर चालायला जात असाल तर, पचनक्रियेला गती देण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगची समस्याही दूर राहते.
वेट लॉससाठी मदत...
ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी सायंकाळी चालावे. वेट लॉस करणाऱ्यांसाठी इव्हिनिंग वॉकचे अनेक फायदे आहेत. सायंकाळी चालल्याने कॅलरीज जलदरित्या बर्न होऊ शकतात. शिवाय दररोज चालण्यामुळे चयापचय क्रिया वाढते. ज्यामुळे चरबी झटपट कमी होते. शरीरात जी काही अतिरिक्त चरबी असते, ती घामाच्या रूपाने बाहेर पडते.
मानसिक आरोग्यासाठी उत्तम...
एनसीबीआयच्या संशोधनानुसार, 'चालल्याने फक्त आरोग्य सुधारत नसून, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. ऑफिसमध्ये दिवसभराच्या थकव्यानंतर, आपण सायंकाळी फिरायला जाऊ शकता. यामुळे मन शांत आणि तणावमुक्त राहील. शिवाय मन देखील प्रसन्न राहील.
पाठदुखीवर आराम...
इव्हनिंग वॉकमुळे आपल्या स्नायूंना आराम मिळतो, यामुळे पाठदुखीचा त्रास होत नाही. ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर अनेकदा लोक खांदे आणि पाठदुखीची तक्रार करतात. त्यामुळे काम झाल्यानंतर सायंकाळी चालायला जरूर जा.
चांगली झोप...
सायंकाळी फेरफटका मारल्यानंतर माणसाला खूप चांगली झोप लागते. कारण चालल्यानंतर आपले शरीर रिलॅक्स होते. शिवाय रात्री चालल्याने मनावर कितीही ताण असला तरी तो कमी होतो.
सकाळी की सायंकाळी? कोणत्या वेळेत चालल्याने वजन होते कमी आणि..
|